** बालरक्षक या पदासाठी नोंदणी लिंक **
https://goo.gl/forms/CY4nzUHYU1o6wNzC2
१) शाळाबाह्य मुलांच्या समस्या विभिन्न स्वरूपाच्या आहेत. ती शाळाबाह्य होण्याची कारणेही विविध सांगितली जातात. या मुलांचा शोध घेऊन त्यांना नियमित शाळेत दाखल करून नियमितपणे शिकवण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे.त्यासाठी या विषयाशी निगडीत झपाटयाने काम करणाऱ्या यंत्रणेतील व्यक्तींंची भूमिका महत्वाची ठरणारी आहे.त्यामुळे शासन व्यवस्थेत झपाट्याने काम करणाऱ्या व्यक्तींची मदत यामध्ये घेण्यात येणार आहे.
२) त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून किमान २ आणि आदिवासी बहुल विविध बोलीभाषेच्या क्षेत्रातील प्रत्येक केंद्रामधून प्रत्येक २ व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे.
३ ) तसेच शहरी भागात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात अनेक अडचणी आहेत. त्यांच्या सुरक्षा विषयक व अन्य प्रकारच्या अडचणी आहेत.
४) त्यासाठी शहरी भागात प्रत्येक URC केंद्रातून किमान ५ व्यक्तींंची निवड करण्यात येणार आहे.
त्यासाठी वरील विषयांशी संबंधीत Commitment संवेदनशीलता व स्वप्रेरणेने काम करण्याची तयारी असणाऱ्या शिक्षकांनी खालील लिंक मध्ये नावे नोंदवावीत.
** या पूर्वी समता विभागाने दिलेल्या लिंक वर काही शिक्षकांनी नोंदणी केली आहे परंतू काही बाबी आवश्यक असल्याने सदर शिक्षकांनी पुन्हा एकदा लिंक भरणे आवश्यक आहे.
*** या शिवाय इतर शिक्षक देखील लिंक भरून नव्याने नोंदणी करू शकतात.
सदर लिंक शिक्षकांच्या विविध ग्रुपवर प्रसारित करण्यात यावी.
समता विभाग
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,
पुणे.
* अधिक माहितीसाठी वाचा -
शासन परिपत्रक क्र.: संकीर्ण २०१६/प्र.क्र.२०२/एसडी.-६
दिनांक -९ जानेवारी २०१७
No comments:
Post a Comment