या ब्लॉग वर माहितीचे संकलन केलेले आहे शिक्षकाना माहिती मिळावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद

My menu

TOTAL VISITS

ब्रिज कोर्स विद्यार्थी माहिती संकलन


*सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणीपूर्वी विद्यार्थी अध्ययन स्थिती माहिती संकलन*


१. उपरोक्त विषयाला अनुसरून माहिती संकलन करण्यासाठी जिल्हा स्तरावर देण्यात आलेल्या पत्राचे व मार्गदर्शक सूचनांचे लक्षपूर्वक वाचन करावे.



२. सदर माहिती संकलनासाठी विद्यार्थ्यांची निवड ही प्रासंगिक पद्धतीने करायचे आहे त्यामुळे आपल्याला माहिती संकलन करताना जे विद्यार्थी सहजतेने उपलब्ध होतील त्यांची माहिती संकलित करावयाची आहे मात्र हे करताना मुला-मुलींचे प्रमाण समान राहील तसेच प्रत्येक इयत्तेचे  ऑफलाइन शिक्षण घेणारे २ विद्यार्थी व ऑनलाईन शिक्षण घेणारे ३ ते ४ विद्यार्थी याप्रकारे माहिती संकलन करायची आहे.


३. केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रातील तर विषय साधन व्यक्ती यांनी यांनी आपल्या संबंधित तालुक्यातील विद्यार्थ्यांची माहिती संकलित करावयाची आहे.


४. जिल्हास्तरावरील DIET मधील अधिकारी व विषय सहाय्यक यांनी आपण ज्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करत आहात तेथील स्थानिक विद्यार्थ्यांची माहिती संकलित करावी.


५. माहिती संकलन करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अथवा स्थानिक प्रशासनाने आवश्यकतेनुसार ज्या सूचना निर्देशीत केल्या आहेत त्याचे पालन करत माहिती संकलन करायचे आहे.


६. खाली दिलेल्या लिंक मध्ये माहिती नोंदवताना सुरुवातीचे १० प्रश्न हे सर्वांसाठी समान आहेत. मात्र ११व्या प्रश्नात इयत्ता निवडल्यानंतर त्या इयत्तेशी संबंधित विषयनिहाय प्रश्न या लिंक वर डिस्प्ले होणार आहेत.

प्रत्येक इयत्तेमध्ये मराठी भाषा विषयापासून सुरुवात होऊन सर्वात शेवटी इंग्रजी विषयाचे प्रश्न देण्यात आले आहेत. Next बटन वर क्लिक केल्यानंतर लिंक सब्मिट होणार आहे.

*माहिती संकलन करण्यासाठी ची लिंक*


तरी सर्वांनी पत्र व मार्गदर्शक सूचना पुढील लिंक वर वाचाव्यात.



यामध्ये दिलेल्या सूचनांनुसार दिलेल्या विहित कालावधीमध्ये सदर माहिती संकलन करण्यात यावे.


*आदेशावरून*

*दिनकर टेमकर*

*संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

No comments:

Post a Comment