या ब्लॉग वर माहितीचे संकलन केलेले आहे शिक्षकाना माहिती मिळावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद

My menu

TOTAL VISITS

Wednesday 30 June 2021

शालार्थ pay slip काढणे

🌸💐🌺🏵🏵🌺💐🌸 🟣 *प्रत्येक महिन्यांची Salary Slip आता ऑनलाईन पाहता येणार* 🟣 आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता. यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा *शालार्थ ID.*(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID) यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा 1) https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp या वेबसाईटला जा. 2) लॉग इन पेजवर जाऊन Username म्हणून तुमचा *शालार्थ ID* टाका. तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे. 3) लॉग इन केल्यानंतर Old password ifms123 हा टाका. New password बनवा (त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा). तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा. 4) लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner जाऊन Pay slip निवडा. 5) 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip निवडा डाउनलोड करा व Print करा. 🌸💐🌺

No comments:

Post a Comment