या ब्लॉग वर माहितीचे संकलन केलेले आहे शिक्षकाना माहिती मिळावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद

My menu

TOTAL VISITS

विकल्प कसा द्यावा

*📌योग्य विकल्प द्या व आर्थिक फायदा करून घ्या*📌

*मित्रहो,*

*काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदच्या वर्ग 3 व 4 साठी वेतन निश्चिती करण्याचा GR आला आहे. वेतन निश्चिती करण्यासाठी सर्वात पहिला टप्पा म्हणजे विकल्प देणे*

*विकल्प म्हणजे काय तर 7 वा वेतन आयोग आपण कोणत्या तारखेपासून स्वीकारणार आहोत*

*विकल्प योग्य देणे अतिशय महत्वाचे आहे.कारण तो जर  चुकीचा दिला तर आपले फार मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते व तो विकल्प बदलण्याची संधी पण नाही*

*त्यासाठी आपण योग्य ती आकडेमोड करून विकल्प द्यावा. आपण विकल्प दोन तारखेस देऊ शकतो*

*१) 1 जानेवारी 2016*

*२) पुढील वेतन वाढी पासून*

*आता आपण विकल्प कसा द्यावा व कोणत्या तारखे पासून द्यावा हे आपण पाहू*

----------------------------------------

*समजा कर्मचारी xyz आहे व त्याचे बेसिक 1 जानेवारी 2016 रोजी 7630 आहे व grade pay 1900 रुपये आहे तर त्याने विकल्प कोणता द्यावा*

*7630+1900 = 9530

*9530x2.57= 24492

*1जानेवारीत 7 व्या वेतन आयोग बेसिक = 24500*

*1जुलै 2016= 25200*

*1जुलै 2017= 26000*

*1जुलै 2018= 26800*

*जुलै 2018 चे बेसिक 26800 झाले*

–--------------------------------------

*आता त्याच कर्मचाऱ्याचे एक वेतन वाढीनुसार आकडेमोड करून पाहू*

*1 जुलै 2016 6 व्या वेतन आयोगातील बेसिक। 7920      व grade pay 1900*

*7920+1900= 9820*

*9820x2.57= 25237*

*1 जुलै 16= 26000*

*1जुलै  17= 26800*

*1जुलै 18 = 27600*

---------------------------------------- 

*वरील दोन्ही उदाहरणे एकाच कर्मचार्याची आहेत पण एक वेतन वाढ घेऊन आकडेमोड केल्यास आपणास एक जास्तीची वेतन वाढ मिळू शकते*

*अशा वेळेस सदरील कर्मचाऱ्याने 1 जुलै चा विकल्प लिहून द्यावा व भरपूर आर्थिक फायदा करून घ्यावा*

*लवकरच 7 व्या आयोगाचे fixation व पुर्ण arries काढणारी शीट माझ्या ब्लॉग वर उपलब्ध होईल.(काम चालू आहे)*

*📲👉9850568201(only whatsapp)*

*📌पवन अग्रवाल📌*

*📌जि.प.के.प्रा.शा. डिग्रस(क.)ता.जि.हिंगोली📌*

*📌pavanagrawal.blogspot.com📌*

*आपल्या मित्रांना पाठवा व त्यांचा सुध्दा आर्थिक फायदा होऊ द्या*

अशीच शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी माझ्या व्हाट्सअप्प ग्रुप ला खालील लिंक द्वारे जॉईन व्हावे.







1 comment:

  1. नमस्कार Sir
    मी प्राथमिक शिक्षक आहे.
    1/1/2016 चे basic11630+2800आहे
    तसेच दि 1/7/2016 चे Basic 12070 +2800आहे
    मला चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणी चा लाभ दि 6/11/2016 ला मिळाला आहे.gp 4200 झाला
    तरी मला 7 pay चा लाभ कसा व केव्हापासून मिळेल
    Please मार्गदर्शन करावे.वेतन आयोग कधी स्वीकारायचा याचे स्वातंत्र्य असते का ?
    मी वेतन आयोग 6/11/2016 पासून स्वीकारला तर चालेल का ?
    तसे असल्यास मला 1/1/2016 ते 5/11/2016 पर्यंतच्या कालावधीतील 7th pay चा फरकाची रक्कम मिळेल का?

    ReplyDelete