pavanagrawal.blogspot.com


WELCOME TO PRAYAG BLOG YOUR VISIT IS INSPIRATION TO ME

या ब्लॉग वर माहितीचे संकलन केलेले आहे शिक्षकाना माहिती मिळावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद

My menu

TOTAL VISITS

955934

जादूचे प्रयोग

कोणतीही हातचलाखी किंवा जादू नाही सरळसरळ विज्ञान तत्वाचा वापर करून हा प्रयोग करून दाखविता येतो
विद्यार्थी च्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षकांनी हे छोटे व सोपे प्रयोग विद्यार्थी ना करून दाखविले पाहिजे
एक सरळ सपट  बुड असलेले धातूचे भांडे घ्यावे  वाटीसुद्धा चालेल एक साधा रंगीत सुती कापड घ्या हा कापड भाड्यांभोवती पुर्ण पणे फिट असा आवरून घ्या व टोकाला पिळ देउन हातात जेणेकरून कापड सैल राहणार नाही
  दुसरा एक कापड राॅकेलमध्ये बुडवून चिमट्यमाध्ये पकडून पेटवावा व वाटीवरील कापडावर ठेवावा जाळ विझल्यावर राख फेकुन वाटीवरील कापड लोकांना दाखवावे
कापड मुळीच जळालेला नसणार कारण वाटी ही उष्णता वाहक आहे त्यामुळे भांडे उष्णता शोषून घेते व कापड जळत नाही

टिप --  कापड जाळण्याचा प्रयोग लहान मुलांनी करायचा नाही तर मोठ्या  व्यक्ती नी करून दाखवायचा आहे.
   
शाइ अदृश्य करणे


एक लिबूं चिरा व लिंबाचा रस एका वाटीत काढून घ्या
शाइचा पेन घेऊन पेनाची निब  लिबांच्या रसात बुडवा
पांढर्‍या शुभ्र कागदावर नाव किवा गुप्त संदेश लिहून काढा
कागद वाळू द्या अक्षरे गायब झालेली असतील
आता कागदाला ओव्हनमध्ये 175 डिग्री तापमानावर 10 मिनिटे ठेवा
किंवा  साध्या लोखंडी तव्यावर सुद्धा  कागद काही वेळ ठेवला तरी अक्षरे पुन्हा दिसायला लागेल
हा प्रयोग मोठ्या माणसांच्या मदतीने करायचा आहे
उष्ण तेने लिबूं तील रसायन जळून अक्षरे पुन्हा दिसायला लागतात।


विद्यार्थी ना करून दाखविण्यासारखे जादूचे प्रयोग


जादू कुंकू काळे करण्याची

शिक्षीत लोकांनी आपल्या शिक्षणाचा व विज्ञानाचा उपयोग करून अंधश्रद्धेचे निर्मुलन केले पाहिजे
  अर्धा लहान चमचाभर कुंकू वात निरमा पावडर घ्या निरमा पावडरातअल्कली असते आणि कुकंवात अल्कली मिळताच काळे होते
 नेमके हिच कृती करून बुवालोक स्त्रियांना घाबरवून त्यांच्या मनात भीती निर्माण करतात
जादू हळदीचे कुंकू करण्याची
      बाबालोक हळदीमध्येथोडा प्रमाणात आधीच निरमा पावडर मिसळून ठेवतात निरमा पावडर अल्कली असते आणि अल्कली मुळे हळद लाल होते नेमके हिच कृती करून बाबालोक भोळ्याभाबड्या स्त्रियांना घाबरवून फसवितात
वस्तू गोड करणे
सॅकरीन साखरेपेक्षा कित्येक पटीने गोड असते  बाबालोक ज्याही वस्तू ला हात लावतील ती वस्तू गोड होते तिर्थ गोड होते यासाठी बाबालोकांनी सॅकरीनच्या गोळ्यांची पावडर आधीच हाताच्या बोटाला चोळली असते बिचारे भक्त यापासून अनभिज्ञ असतात आणि याच गोष्टीचा फायदा बाबा उचलतात
लिबांतून रक्त काढणे
साहित्य--एक लिबूं  चाकू मिथील ऑरेंज च द्रावण
चाकुच्या पात्याला मिथील ऑरेंज च द्रावण लावावे थोड्या वेळाने त्या चाकुणे लिबूं कापल्यास लाल रक्ताप्रमाणे रस बाहेर येतो हि। कृती तुम्ही कोणत्याही मंत्र न म्हणता करू दाखवू शकतात व लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करू शकता
ताब्यांचे भांडे वर उचलणे
ताब्यांचे लोटि घ्या(भरणे) घ्या ते काठोकाठ तांदूळाणे भरूण घ्या त्यामध्ये एक साधारण मोठा पेचकस घेवून तो 4ते5 वेळा टोचा तांदूळाचे दाणे हवा निघून गेल्यावर एकदम फिट होतात तेव्हा पेचकस वर उचलूण घ्या ताब्यां वर उचलला जाइल
पृथ्वी तून परमेश्वर प्रगट करणे
हा प्रयोग विद्यार्थी ना शाळेत करूण दाखवा
 एक जमिनीमध्ये खड्डा खोदा त्यामधे आधीच एक दोन किलो चणे टाकूण ठेवा त्यावर मुर्ती समजून एक चापट दगड ठेवा व वर माती झाकून ठेवा  दोन तिन दिवस त्यावर थोडे थोडे पाणी घालावे  चौथ्या दिवशी मुर्ती म्हणून दगड वर येइल विद्यार्थी ला यामागचे शास्त्रीय कारण समजावून द्या

मत्रांने होम पेटविणे
  कृती. ... फाॅस्षरस कपड्यात गुडांळुन सफाईदार पणे होमात ठेवले जाळ होइल किंवा कागदावर पोटॅशियम परमॅग्नेट आधीच लाकडामध्ये टाकूण ठेवून त्यावर तुप ओता(येथे तुप म्हणून ग्लिसरीन ओतावे  म्हणजे आपोआप जाळ होइल ग्लिसरीन मध्ये पेट्रोल टाकल्यास ही क्रिया लवकर होते
 सर्व प्रयोग करतांना भोदूंबाबाची अॅकटीग करावी म्हणजे प्रयोगामध्ये जिवंतपणा येइल लहान मुलांना प्रत्यक्ष प्रयोग करू न देता समजावून करून दाखवावे  हे प्रयोग विज्ञान प्रदर्शनी मध्ये करून दाखवू शकता

No comments:

Post a Comment

T
I
S
I
V
R
O
F
U
O
Y
K
N
A
H
T