या ब्लॉग वर माहितीचे संकलन केलेले आहे शिक्षकाना माहिती मिळावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद

My menu

TOTAL VISITS

E- Service Book Manual


*Online सर्व्हिस बुक भरणेसाठी पूर्वतयारी म्हणून काही शिक्षक बंधूनी केलेल्या सुचनानेवरून खलील बाबी विस्तृत स्वरूपात पाठवत आहे*


```तरी आवश्यकता भासल्यास सदर सूचनांचा उपयोग करून दुसऱ्या टप्यातील सर्व्हिस बुक माहिती भरण्यासाठी दिलेल्या फॉर्म मध्ये माहिती भरण्यासाठी करावा```


* *जेवढी माहिती आपल्याजवळ उपलब्ध आहे अथवा माहिती आहे तितकीच माहिती फॉर्म मध्ये भरावी, माहिती नसल्यास रकाना कोरा ठेवावा*


 *१)प्रथम नियुक्ती आदेश प्रतीची छायांकित प्रत*

 *२)नियुक्ती प्रकार कोणता त्याबाबतचे पत्र/प्रमाणपत्राची छायांकित प्रत*

*३)प्रथम नियुक्ती नंतर आतापर्यंत झालेल्या सर्व बदल्यांचे आदेश, पदोन्नती चे आदेशांची छायांकित प्रती.*

*४)इयत्ता १०वी आणि त्यापुढील आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक,व्यावसायिक अर्हता ची उत्तीर्णतेची प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती.*

*५)नोकरी लागल्यानंतर शैक्षणिक/व्यावसायिक अर्हता वाढविली असल्यास त्याबाबतचे परवानगी पत्र.*

*६)पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस प्रशिक्षण झालेले असेल अशा सर्व प्रशिक्षणाचे आदेश,कार्यमुक्ती प्रमाणपत्र,प्रशस्तीपत्र यांच्या छायांकित प्रती.*

*७)वरिष्ठ वेतनश्रेणी ,निवडश्रेणी मंजुरीचे आदेश यांची छायांकित प्रत*

*८)विविध वेतनवाढी बाबतचे मंजुरीचे आदेशांची छायांकित प्रत*

*९)MSCIT उत्तीर्ण बाबत प्रमाणपत्राची छायांकित प्रत*

*१०)शालार्थचा ID*

*११) GPF नंब.*

*१२)Blood Group*

*१३)कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्ड ची छायांकित प्रत.*

*१४)कुटुंबातील सर्वांच्या जन्म तारीख.*

*१५)आपण ज्या प्रकारचे कर्ज काढले असेल(उदा.गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, GPF ऍडव्हान्स, Car Loan)त्या कर्जाचे अकाउंट नंबर, मंजुरी पत्र क्रमांक, मंजुरी दिनांक, मंजूर रक्कम, शेवटच्या हप्त्याचा दिनांक याबाबत सोबत माहिती आणावी.*

*१६)सेवापुस्तकात ज्यांना वारस(Nominee)लावले असेल त्यांचे बँकेतील बचत खाते क्रमांक, IFSC कोड, बँकेचे नाव, गाव याबाबत माहिती सोबत आणावी.*

*१७)आपणास जो पुरस्कार मिळाला असेल त्याचे प्रमाणपत्रची छायांकित प्रत,ते केव्हा आणि कशाबद्दल मिळाले याबाबत माहिती सोबत आणावी.*


*टीप-सर्व छायांकित प्रती scan करावयाच्या असल्याने चांगल्या दर्जाच्या ,स्पष्ट दिसतील अशाच द्याव्या .तसेच सर्व छायांकित प्रती self attested करूनच द्याव्यात.*






No comments:

Post a Comment