शालेय पोषण आहार योजने अंतर्गत न्युट्रीटिव्ह स्लाईस *(बिस्किटे)* शाळेपर्यंत पोहचत आहेत.
या संदर्भात याचा वाटप कसा करायचा अशी विचारणा काही शिक्षकांकडून होत आहे.
👉🏼त्याबाबतची माहीती पुढीलप्रमाणे- दि.8 सप्टेंबर 2021 च्या महाराष्ट्र शासनाचे पत्रानुसार या योजने अंतर्गत महिन्याचे 24 दिवसांकरिता पुढीलप्रमाणे शाळांना साठा वाटप सुरू झाला आहे.
*♻️ इयत्ता 1 ते 5 करीता ♻️*
🧇 तांदूळ-1
🧇 बाजरी-1
🧇 ज्वारी -2
🧇 नाचणी -1
🧇सोयाबीन-1
असे एकूण *6* पॅकेट प्रती विद्यार्थी मिळत आहेत.
*♻️ इयत्ता 6ते 8 करीता ♻️*
🧇तांदूळ-1
🧇बाजरी-2
🧇ज्वारी -2
🧇नाचणी -2
🧇सोयाबीन-2
असे एकूण *9* पॅकेट प्रती विद्यार्थी मिळत आहेत.
💠 वरील प्रमाणे साठा प्राप्त झाल्यानंतर एकाच वेळेस टप्प्या टप्प्याने विद्यार्थी किवा पालकांना बोलावून इयत्ता 1ते 5 च्या विद्यार्थ्याला प्रत्येकी 6 पॅकेट तर इयत्ता 6 ते 8 चे विद्यार्थ्याला प्रत्येकी 9 पॅकेट वाटप करावयाचे आहे.
👉🏼 प्रत्येक पॅकेट 120 ग्रॅम वजनाचे असून त्यात 16 स्लाईस (बिस्किटे) आहेत.
*🚸 1ते 5 च्या विद्यार्थ्याने* आठवड्यातून पाच दिवस दररोज *4* बिस्किटे खावयाची आहेत तर.
*🚸 6 ते 8 च्या विद्यार्थ्याने* आठवड्यातून पाच दिवस दररोज *6* बिस्किटे खावयाची आहेत.अशा सुचना विद्यार्थी/पालकांना आपण द्यावयाच्या आहे.
No comments:
Post a Comment