या ब्लॉग वर माहितीचे संकलन केलेले आहे शिक्षकाना माहिती मिळावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद

My menu

TOTAL VISITS

Friday 10 August 2018

जंत नाशक मोहीम 2018

💊 *राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम* 💊


*दि.10/08/2018* रोजी शाळा व अंगणवाडयामध्ये मुलांना (वय वर्ष १ ते १८) जंतनाशक गोळी खाऊ घालण्याची मोहिम राबवायची आहे.


🔹जंताचा बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम

🔺रक्तक्षय (अनिमिया )

🔺पोटदुखी,उलट्या, अतिसार, मळमळणे

🔺भूक मंदावणे

🔺कुपोषण

🔺थकवा व अस्वस्थता

🔺शौचाच्या वेळेस रक्त पडणे

🔺आतड्याला सुज येणे.


🔵 जंताचा प्रादुर्भाव थोपविण्याचे मार्ग

🔺जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे

🔺भाज्या व फळे खाण्यापुर्वी व्यवस्थित धुणे

🔺स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे.

🔺पायात चपला,बुट घालावेत

🔺नियमित नखे कापावित

🔺शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचाला बसु नये

🔺परिसर स्वच्छ ठेवावा.


🔵जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे

🔺रक्तक्षय (अनिमिया)कमी होतो

🔺बालक क्रियाशिल होते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

🔺शारिरीक व बौध्दिक वाढ सुधारते

🔺आरोग्य चांगले राहते.


🔹 *जंतनाशक गोळी- एल्बेंडेझाॅल ४०० मि.ग्रॅम* 


🔺वय १ ते २ वर्ष अर्धीगोळी (२०० मि ग्रॅम)क्रश करून पाण्यात विरघळून

🔺वय २ ते 3 वर्ष एक गोळी (४०० मि ग्रॅम) क्रश करून पाण्यात विरघळून 

वय:- 3 ते19 वर्ष एक गोळी(400मि ग्रॅम)  चघळून खाऊ घालणे. 


🔵प्रत्येक शाळा,अंगणवाडीत *दि 10/08/2018* रोजी जंतनाशक गोळी मुलांना प्रत्यक्ष समोर उभे करुन खाऊ घालण्याची मोहिम हाती घ्यावयाची आहे.


शाळाबाहय मुले मुली यांना अंगणवाडी केंद्रात गोळया देणार आहेत.


🔹गोळी खाऊ घालण्यापुर्वी घ्यावयाची काळजी

🔺आहार खाऊ घातल्यानंतर गोळी खाऊ घालणे.रिकाम्या पोटी गोळी खाऊ घालू नये.

🔺प्रत्येक शाळेत एक आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहे.

🔺आजारी बालकांना गोळी देऊ नये.ते बालक ठिक झाल्यानंतर किंवा वंचित लाभार्थी यांना *मॉप अप राऊंड दिन* दि 16-08-2018 गोळी देणे.

🔺गोळी दिल्यानंतर २ तास मुलांना शाळा, अंगणवाडीत थांबवून ठेवावे.

🔺गोळी खाल्यानंतर काही दुष्परिणाम दिसल्यास क्षार संजिवनी पाजणे.त्वरीत वैदयकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधणे. 

🔺ज्यामुलांच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त आहे त्यामुलांना गोळी खाल्या नंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तेंव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही...

No comments:

Post a Comment