या ब्लॉग वर माहितीचे संकलन केलेले आहे शिक्षकाना माहिती मिळावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद

My menu

TOTAL VISITS

Friday, 5 November 2021

विद्यार्थी उपस्थिती आता अँप द्वारे

 

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमंतगत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डीजीटल शाळाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहीली आहे. तत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा,शीक्षक व विद्यार्थ्यांची माहीती भरण्यात आली आहे. भारत सरकारने PGI (Performance Grading Index) हा निर्देशांक विकसित केला आहे. यामध्ये शीक्षक व विद्यार्थ्यांची डीजीटल पध्दतीने उपस्थिती यासाठी गुण आहेत यासाठी राज्याने विकसीत केलेल्या सरल प्रणाली मध्ये शाळाांच्या विद्यार्थी व शीक्षक याांच्या माहीतीच्या आधारे राज्यातील शाळाांमधील विद्यार्थ्यांची व शिक्षकाची उपस्थिती नोंद ठेवण्यासाठी सरल प्रणाली सुविधा उपलब्ध करून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकाची उपस्थिती डीजीटल पध्दतीने MahaStudent ॲपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

2.

यानुसार  MahaStudent हे ॲप विकसित करण्यात आले आहे. सदर ॲप हे गुगल प्ले स्टोअर वर MahaStudent या नावाने उपलब्ध आहे. या ॲप मध्ये शीक्षकाासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डीजीटल पध्दतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्याआधारे शिक्षकाला आपल्या वर्गातील अनुपस्थिती विद्यार्थ्यांची गैरहजेरी काही चुटकी सरशी नोंदवता येणार आहे. याचसोबत शाळेमधील सर्व शिक्षकाची उपस्थिती नोंदवण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर ॲप मुळे  शिक्षकाना विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. याचसोबत मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहीती भरण्याची आवश्यकता राहणार नाही यासाठी आवश्यक असणारे दोन्ही ॲपचे एकत्रीकरण करण्यात येईल. यामुळे राज्य,जिल्हा,तालुका व केंद्रस्तरावर एका क्लिकवर विद्यार्थ्यांची उपस्थिती शिक्षकााची उपस्थिती कळण्यास मदत होणार आहे.

3.तरी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकााची उपस्थिती डिजिटल पध्दतीने MahaStudent ॲपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे

अँप डाउनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा



No comments:

Post a Comment