या ब्लॉग वर माहितीचे संकलन केलेले आहे शिक्षकाना माहिती मिळावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद

My menu

TOTAL VISITS

Tuesday 7 May 2024

NBSK Exam Result - नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन २०२२-२७ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) दि. १७ मार्च २०२४ निकाल लिंक


NBSK Exam Result - नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन २०२२-२७ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) दि. १७ मार्च २०२४ निकाल लिंक

 केंद्रपुरस्कृत उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन २०२२-२७ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) दि. १७ मार्च २०२४


केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन २०२२-२७ अंतर्गत राज्यामध्ये दि.१७ मार्च २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेचा निकाल दि. ०६/०५/२०२४ रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या (NIOS) www.nios.ac.in or https://results.nios.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला आहे. सदर परीक्षेच्या निकालाची सांख्यिकीय माहिती खालीलप्रमाणे आहे.

१) निकाल प्राप्त करणे

अ) वैयक्तिक निकाल प्राप्त करण्यासाठी Path

www.nios.ac.in or https://results.nios.ac.in ला भेट देणे Examination/Result Click here for Result Saksharta Karyakram Marksheet Cum Certificate Year, Month आणि Captcha टाकून Submit बटनावर click करावे ULLAS Nav Bharat Enrollment Number, Print


ब) जिल्हाचा एकत्रित निकाल प्राप्त करण्यासाठी Path


www.www.nios.ac.in or https://results.nios.ac.in ला भेट देणे Examination/Result Click here for Result ULLAS Nav Bharat Saksharta karyakram Marksheet cum Certificate Districtwise State, District, Year, Month, Captcha टाकून Submit बटनावर click करावे, हव्या असलेल्या जिल्हयाची यादी pdf स्वरुपात प्राप्त होईल. त्यामध्ये अनुक्रमांक, बैठक क्रमांक, नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, वय, निकालाची तारीख, भागनिहाय गुण, एकूण गुण आणि निकाल असे रकाने असतील.


किंवा

उल्लास अॅपवरील Home page वरील Certification या आयकॉनवर क्लिक करुन राज्य, जिल्हा, वर्ष, महिना, निवडून स्क्रीनवरील Captcha त्याखालील चौकटीत टाईप करुन Submit बटनावर click करावे.


२) निकाल प्राप्त करण्यासाठी अडचण येत असल्यास :

निकाल प्राप्त करुन घेण्यासाठी परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी, साक्षर कुटुंबिय, स्वयंसेवक अथवा शिक्षकांनी नवसाक्षरांना मदत करावी.

NIOS च्या संकेतस्थळावर ULLAS-Nav Bharat Sakshar Karykram 2024 असे नमूद असलेल्या Tab वर वैयक्तिक किंवा जिल्हानिहाय एकत्रित निकाल प्राप्त करावयाच्या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर उघडणा- या विंडोजमध्ये अचूक माहिती भरावी. Submit बटनावर Click केल्यास निकाल प्राप्त होईल. FLNAT परीक्षेवेळी केंद्र संचालकांनी १४ अंकी बैठक क्रमांक अचूकपणे परीक्षार्थ्यांना देणे आवश्यक आहे. त्यातील पहिले ११ अंक हे संबंधित परीक्षा केंद्र शाळेचा UDISE क्रमांक असून उर्वरित तीन अंक हे त्या केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या परीक्षार्थ्यास ००१, ००२, ००३,... असे दिलेले क्रमांक आहेत. बैठक क्रमांक देतेवेळी अथवा निकालाच्या Excel Sheet मध्ये माहिती भरतेवेळी चूक झाली असल्यास असे बैठक क्रमांक योजना संचालनालय स्तरावर दुरुस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे चुकलेले, दुबार झालेले बैठक क्रमांक दुरुस्त करुन निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

माहिती पत्रक डाउनलोड करण्यासाठी लिंक क्लिक करा



No comments:

Post a Comment