pavanagrawal.blogspot.com


WELCOME TO PRAYAG BLOG YOUR VISIT IS INSPIRATION TO ME

या ब्लॉग वर माहितीचे संकलन केलेले आहे शिक्षकाना माहिती मिळावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद

My menu

TOTAL VISITS

959036

Wednesday, 2 April 2025

NMMS 2024-25 पात्र विद्यार्थी यादी

  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ.८ वी साठी परीक्षा दिनांक २२ डिसेंबर, २०२४ ची शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादीबाबत.


 


सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही शिक्षा मंत्रालय , भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा हेतू आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती इ. ९ वी ते १२ वी पर्यंत (चार वर्षांसाठी) मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु.१०००/-आहे (वार्षिक रु.१२,०००/-).

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दि. २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी दि. ०७/०२/२०२५ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना / पालकांना शाळेमार्फत जात, दिव्यांगत्व, जन्म दिनांक इ. बाबतची दुरुस्ती असल्यास दि. १८/०२/२०२५ पर्यंत परिषदेकडे ऑनलाईन पाठविणेबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी/पालकांनी शाळेमार्फत पाठविलेल्या दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी मंगळवार, दिनांक ०१/०४/२०२५ रोजी जाहीर करण्यात येत आहे.

दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या NMMS परीक्षसाठी २४८७५८ विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११६८२ शिष्यवृत्ती कोटा शिक्षण मंत्रालय (MoE), नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी ४% आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व ८ वी ची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हयानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. सदरची निवडयादी व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर मंगळवार, दिनांक ०१/०४/२०२५ रोजी पासून पाहता येईल.

> सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घ्यावयाचा आहे.

> शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (योजना) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचेमार्फत केले जाते.

*शंका,प्रश्न - 

१. निवड यादी मध्ये नाव नसणे - i. मेरीट नुसार निवड नसणे ii. राज्य मध्ये निवड करत असताना प्रवर्ग निहाय कोटा निश्चित केलेला आहे त्यानुसार विद्यार्थांची निवड करण्यात येते. iii.  कोणतेही शंका किंवा तक्रार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना संपर्क करू शकता किंवा ई- मेल द्वारे/टपालद्वारे पत्र पाठवू शकता.

२. विद्यार्थाच्या नावात दुरुस्ती असल्यास - त्वरित परीक्षा परिषद यांना लेखी कळवण्यात यावे व आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी. nmms निकाल वर विद्यार्थाचे नाव , जन्म तारीख ही विद्यार्थाच्या आधार नुसार असणे आवश्यक आहे.

३. शिष्यवृत्ती रक्कम कधी मिळते -
i. विद्यार्थाची इयत्ता ८ वी मध्ये परीक्षा द्वारे निवड केली जाते. विद्यार्थी इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये शिष्यवृत्ती चा लाभ घेतो.

ii. विद्यार्थाने nsp पोर्टल वर online पद्वतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (जुलै ते सप्टेंबर दरम्यान अर्ज करता येतो. मुदत संपल्यावर अर्ज करता येत नाही)

iii. nsp पोर्टल वर online अर्ज भरला नाही किंवा अर्जाची पडताळणी विहित कालावधी मध्ये शाळा व जिल्हा स्तरावरून झाली नाही तर विद्यार्थास शिष्यावृतीचा लाभ मिळत नाही.

iv. विद्यार्थाने शासकीय किंवा अनुदानित शाळेत शिक्षण घेणे आवश्यक आहे.

v.  nsp पोर्टल वर online अर्ज विद्यार्थी किंवा शाळा करू शकते. (mobile  किंवा कॉम्पुटर च्या माध्यमातून )

vi. विद्यार्थाच्या आधार क्रमांकास बँक खाते सीडिंग (NPCI mapping) असणे आवश्यक आहे तसेच mobile क्रमांक लिंक असले देखील आवश्यक आहे.

 vii. शिष्यवृत्ती निकाल बाबत कोणतेही अडचण किंवा शंका असल्यास परीक्षा परिषद यांना संपर्क करावा.सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

पत्ता :
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (दूसरा व चौथा मजला) सर्वे नंबर ८३२ ए , फायनल प्लॉट क्रमांक १७८ व १७९, बालचित्रवाणी जवळ , आघारकर रीसर्च इंस्टीट्यूटच्या मागे भांबुर्डा , शिवाजीनगर , पुणे 411004

तसेच शिष्यवृत्ती रक्कम बाबत कोणतेही शंका असल्यास शिक्षण संचालनालय (योजना) यांना संपर्क करावा. सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

पत्ता :

शिक्षण संचालनालय (योजना)

१७,डॉ.आंबेडकर मार्ग, लाल देऊळ जवळ, पुणे कॅम्प ,

पुणे ४११००१ 



            

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) - २२ डिसेंबर २०२४ निकाल

  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ.८ वी साठी परीक्षा दिनांक २२ डिसेंबर, २०२४ ची शिष्...

No comments:

Post a Comment

T
I
S
I
V
R
O
F
U
O
Y
K
N
A
H
T