या ब्लॉग वर माहितीचे संकलन केलेले आहे शिक्षकाना माहिती मिळावी एवढाच उद्देश आहे धन्यवाद

My menu

TOTAL VISITS

Thursday 21 December 2023

निपुण भारत माता पालक गट पुनर्बांधणी

निपुण भारत अभियान अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ मध्ये इयत्ता 1ली ते 3 री या इयत्ताच्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाचे पुनर्गठन प्रत्येक शाळेचे झालेले आहे. तरी सर्व प्राथमिक शाळांनी *सर्व माता पालक गटाची गट निहाय पुनर्बांधणीची संकलित नोंदणी खालील लिंकच्या माध्यमातून करावे.* *माता पालक गट माहिती संकलन लिंक* - *https://bit.ly/nipunmothersgroup* प्रत्येक शाळेतून मुख्याध्यापक अथवा शिक्षक यापैकी एक व्यक्ती यांनी आपल्या शाळा अंतर्गत सर्व गटाची गट निहाय संकलित माहिती 31 डिसेंबर 2023 पूर्वी भरावी. निपुण महाराष्ट्र कार्यक्रम.

Wednesday 20 December 2023

नवोदय हॉल तिकीट 2023-24

 

🌸💐🌺🏵🏵🌺💐🌸 नवोदय परीक्षा 20 जानेवारी 2024 होणार आहे तिचे हॉल तिकीट उपलब्द झाले आहे विद्यार्थी id व जन्म तारीख आवश्यक आहे 🏵🌸💐🌺 लिंक https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard

Friday 12 November 2021

MDM नुट्रीटीव्ह स्लाइस बाबत

 *MDM न्युट्रीटिव्ह स्लाईस बाबत*

 🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜

     

 शालेय पोषण आहार योजने अंतर्गत न्युट्रीटिव्ह स्लाईस *(बिस्किटे)* शाळेपर्यंत पोहचत आहेत.

या संदर्भात याचा वाटप कसा करायचा अशी विचारणा काही शिक्षकांकडून होत आहे.

      👉🏼त्याबाबतची माहीती पुढीलप्रमाणे- दि.8 सप्टेंबर 2021 च्या महाराष्ट्र शासनाचे पत्रानुसार या योजने अंतर्गत महिन्याचे 24 दिवसांकरिता पुढीलप्रमाणे शाळांना साठा वाटप सुरू झाला आहे. 


  *♻️ इयत्ता 1 ते 5 करीता ♻️*

🧇 तांदूळ-1

🧇 बाजरी-1

🧇 ज्वारी -2

🧇 नाचणी -1

🧇सोयाबीन-1

असे एकूण *6* पॅकेट प्रती विद्यार्थी मिळत आहेत.


 *♻️ इयत्ता 6ते 8 करीता ♻️*

🧇तांदूळ-1

🧇बाजरी-2

🧇ज्वारी -2

🧇नाचणी -2

🧇सोयाबीन-2

असे एकूण *9* पॅकेट प्रती विद्यार्थी मिळत आहेत.


    💠 वरील प्रमाणे साठा प्राप्त झाल्यानंतर एकाच वेळेस  टप्प्या टप्प्याने विद्यार्थी किवा पालकांना बोलावून इयत्ता 1ते 5 च्या विद्यार्थ्याला प्रत्येकी 6 पॅकेट तर इयत्ता 6 ते 8 चे विद्यार्थ्याला प्रत्येकी 9 पॅकेट वाटप करावयाचे आहे.


 👉🏼 प्रत्येक पॅकेट 120 ग्रॅम वजनाचे असून त्यात 16 स्लाईस (बिस्किटे) आहेत.


 *🚸 1ते 5 च्या विद्यार्थ्याने* आठवड्यातून पाच दिवस दररोज *4* बिस्किटे खावयाची आहेत तर.


*🚸 6 ते 8 च्या विद्यार्थ्याने* आठवड्यातून पाच दिवस दररोज *6* बिस्किटे खावयाची आहेत.अशा सुचना विद्यार्थी/पालकांना आपण द्यावयाच्या आहे.

            

*🙏🏼🙏🏼🙏🏼(माहितीस्तव)🙏🏼🙏🏼🙏🏼*

बिस्कीट वाटप नमुना




Friday 5 November 2021

विद्यार्थी उपस्थिती आता अँप द्वारे

 

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमंतगत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डीजीटल शाळाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहीली आहे. तत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा,शीक्षक व विद्यार्थ्यांची माहीती भरण्यात आली आहे. भारत सरकारने PGI (Performance Grading Index) हा निर्देशांक विकसित केला आहे. यामध्ये शीक्षक व विद्यार्थ्यांची डीजीटल पध्दतीने उपस्थिती यासाठी गुण आहेत यासाठी राज्याने विकसीत केलेल्या सरल प्रणाली मध्ये शाळाांच्या विद्यार्थी व शीक्षक याांच्या माहीतीच्या आधारे राज्यातील शाळाांमधील विद्यार्थ्यांची व शिक्षकाची उपस्थिती नोंद ठेवण्यासाठी सरल प्रणाली सुविधा उपलब्ध करून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकाची उपस्थिती डीजीटल पध्दतीने MahaStudent ॲपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

2.

यानुसार  MahaStudent हे ॲप विकसित करण्यात आले आहे. सदर ॲप हे गुगल प्ले स्टोअर वर MahaStudent या नावाने उपलब्ध आहे. या ॲप मध्ये शीक्षकाासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डीजीटल पध्दतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्याआधारे शिक्षकाला आपल्या वर्गातील अनुपस्थिती विद्यार्थ्यांची गैरहजेरी काही चुटकी सरशी नोंदवता येणार आहे. याचसोबत शाळेमधील सर्व शिक्षकाची उपस्थिती नोंदवण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर ॲप मुळे  शिक्षकाना विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. याचसोबत मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहीती भरण्याची आवश्यकता राहणार नाही यासाठी आवश्यक असणारे दोन्ही ॲपचे एकत्रीकरण करण्यात येईल. यामुळे राज्य,जिल्हा,तालुका व केंद्रस्तरावर एका क्लिकवर विद्यार्थ्यांची उपस्थिती शिक्षकााची उपस्थिती कळण्यास मदत होणार आहे.

3.तरी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकााची उपस्थिती डिजिटल पध्दतीने MahaStudent ॲपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे

अँप डाउनलोड करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा



Monday 1 November 2021

कला उत्सव

  


माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय,नवी दिल्ली यांच्यामार्फत कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. सन 2021-22 मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, शास्त्रीय संगीत वादन, पारंपारिक लोकसंगीत वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपरिक लोकनृत्य, द्वीमितीय चित्र, त्रिमितीय चित्र/शिल्प व खेळणी तयार करणे या ९ कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. या सर्व प्रकारांमध्ये ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
  • कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (Solo)सहभाग असणार आहे.
  • कोणत्याही कला प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निकषात नमूद केल्यानुसार ४ ते ६ मिनिटांचा व्हिडीओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावा.
  • तयार केलेला व्हिडिओ व त्यासोबत कला सादर करतानाचे वेगवेगळे ५ फोटो विद्यार्थ्यांने स्वतच्या/पालक/शिक्षकाच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून #kalautsavmah२०२१ या हॅशटॅगचा वापर करून दि. १३ नोव्हेंबर २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोस्ट करावा. फेसबुक, इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक copy करून ठेवावी.
  • तदनंतर विद्यार्थ्यांने आपली नोंदणी या पोर्टल जाऊन करावी. व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक पोर्टलवर माहिती भरताना योग्य ठिकाणी Paste करावी. पोर्टलवर नोंदणी करताना सर्व माहिती विद्यार्थ्यांने बिनचूक व पूर्ण भरावी.
  • प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक कला प्रकारात सर्वोत्कृष्ट १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी अशा ९ कला प्रकारात १८ विद्यार्थ्यांची निवड ठरवून दिलेल्या निकषानुसार गुणदान करून केली जाईल.
  • प्रत्येक जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट स्पर्धकांमधून प्राप्त झालेली नामनिर्देशने व व्हिडिओ यांची तपासणी राज्यस्तरीय तज्ञ समितीमार्फत करण्यात येईल.
  • तदनंतर राज्यस्तरावर समितीमार्फत निवडलेले सर्वोत्कृष्ट स्पर्धक Online /प्रत्यक्ष सादरीकरण करतील. यामधून प्रत्येक कलाप्रकारासाठी १ विद्यार्थी व १ विद्यार्थिनी अशा ९ कलाप्रकारामध्ये १८ विद्यार्थ्यांची अंतिम निवड राज्यस्तरावर करून राष्ट्रीय स्तरावर त्यांची नामनिर्देशाने पाठविण्यात येतील.
  • राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ह्या online पद्धतीने होणार आहेत. राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना याबाबत स्वतंत्रपणे कळविले जाईल.


शास्त्रीय गायन
 
पारंपारिक गायन
 
शास्त्रीय संगीत वादन
 
पारंपारिक लोकसंगीत वादन
 
शास्त्रीय नृत्य
 
पारंपरिक लोकनृत्य
 
द्वीमितीय चित्र
 
त्रिमितीय चित्र
 
शिल्प व खेळणी

Thursday 28 October 2021

Wednesday 27 October 2021

NAS ची संपूर्ण माहिती

 *✍️,,,राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण(NAS) शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना सूचना*

*दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण(NAS)*



शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना द्यावयाच्या सूचना

1.सदरची चाचणी दिनांक 12 नोव्हेंबर 2021 (संभाव्य) रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) घेण्यात येणार आहे.


२. सदर सर्वेक्षण इयता ३ री,५ वी, ८ वी व १० वी च्या वर्गाचे करण्यात येणार आहे.


३. यासाठी इयता ३ री,५ वी, ८ वी व १० वी चे वर्ग असलेली कोणतीही शाळा यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Random Sampling) निवडली जाते.


४. कोणती शाळा व त्या शाळेतील कोणती इयत्ता निवडली गेलेली आहे, हे तीन दिवस अगोदर केंद्र शासनाकडून कळेल. निवड केलेल्या शाळांची यादी केंदाकडून प्राप्त होताच लगेच आपणास कळविण्यात येईल.


५. यामध्ये सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमाच्या शाळांचा समावेश यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने नमुना निवड करताना केला जातो.


६. इयता ३ री, ५ वी, ८ वी व १० वी चे वर्ग असलेली कोणतीही शाळा निवडली जाण्याची शक्यता असते.


७. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण पुर्वतयारीचा भाग म्हणून सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळा सर्वेक्षणाच्या दिवसासह दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरु राहतील.


८. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी आपल्या तालुक्यातील कोणत्या शाळा व कोणते वर्ग निवडलेले आहेत हे सर्वेक्षण दिनांकाच्या अगोदर तीन दिवस कळवण्यात येईल.


९. निवडलेल्या शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, ज्या मोठ्या हॉलमध्ये चाचणी घेण्यात येणार आहे त्या वर्गाची स्वच्छता, बैठक व्यवस्था, हॅन्ड सॅनिटायझर, सुरक्षित अंतर राहील, अशी बाकांची व्यवस्था करावी.


१०. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, अशी बैठकीची व्यवस्था करावी.


११. चाचणीसाठी निवड केलेल्या व शाळेचे मूळ माध्यम असलेल्या वर्गाच्या एकापेक्षा जास्त तुकड्या असतील तर सर्व तुकड्यातील विद्यार्थी उपस्थित ठेवावे. त्यापैकी एक तुकडी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Randam Sampling – chit draw Method) निवडली जाईल.


१२. चाचणीसाठी जास्तीत जास्त ३० विद्यार्थी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Randam Sampling) सर्वेक्षणाच्या दिवशी निवडले जातील.


१३. निवडलेल्या वर्गात चाचणीसाठी ३० विद्यार्थी संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर नमुना निवड करण्याची आवश्यकता नाही.


१४. दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत निवड केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पर्यवेक्षकीय यंत्रणेतील घटक , क्षेत्रीय अन्वेषक इत्यादीपैकी कोणीही अनुपस्थीत राहणार नाही अथवा मुख्यालय सोडणार नाही याबाबत सर्वाना अवगत करावे.


१५. दिवाळी सुट्टी पूर्वी पालक सभा घेण्यात यावी. जर सर्वेक्षणासाठी शाळा निवडली गेली तर पालकांना सर्वेक्षण दिनांकाच्या साधारणतः ३ दिवस अगोदर कळविण्यात येईल व त्यानुसार पालकांनी आपले पाल्यांना सर्वेक्षणासाठी शाळेला पाठवावे अश्या सूचना पालक सभेत देण्यात याव्यात. दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत निवड केलेल्या शाळांमध्ये जिल्ह्याचा नमुना /शाळेचा नमुना कमी होऊ नये म्हणून निवड केलेल्या वर्गाचे सर्व विद्यार्थी १०० टक्के उपस्थित राहतील, याबाबत सूचना द्याव्यात. सर्वेक्षणा दिवशी विद्यार्थी सकाळी ८:३० वाजता उपस्थित असणे अपेक्षित आहे व सर्वेक्षणाचे काम साधारणतः १:३० वाजेपर्यंत असेल त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी येताना जेवून करून येण्यास सांगावे. 


दिवस क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक आपल्या शाळेला भेट देवून चाचणी साठी आवश्यक ती पूर्वतयारी करणार आहेत. तरी त्यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून द्यावी व वेळोवेळी सहकार्य करावे.


१७. दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजता सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेत क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक उपस्थित राहून विद्यार्थी संपादणूक चाचणी(AT), विद्यार्थी प्रश्नावली(PQ)), शिक्षक प्रश्नावली(TQ), शाळा प्रश्नावली (SQ), क्षेत्रीय टीपण (Field Note) इत्यादी भरून घेतील, तरी त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे.


१८. विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येताना काळ्या रंगाचे किमान २ बॉल पॉइट पेन सोबत ठेवावे तसेच शाळेनी सुद्धा काही प्रमाणात पेन शिल्लक ठेवावे


१९. विद्यार्थी संपादणूक चाचणी(AT), विद्यार्थी प्रश्नावली(PQ)), शिक्षक प्रश्नावली(TQ), शाळा प्रश्नावली (SQ) इ. प्रतिसाद OMR पद्धतीने नोंदविले जाणार आहेत.


२०.वर्गव विषय-संबंधित वर्गाना पुढे दिलेले विषय शिकविणारे सर्व शिक्षक सर्वेक्षणादरम्यान उपस्थित असणे अनिवार्य आहे.


२१. सध्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी शाळांच्या पुर्वतयारीचा भाग म्हणून सर्व शाळांनी खालील माहिती दीपावली सुट्टी लागण्यापूर्वी तयार ठेवावी.


सर्वेक्षणासाठी खालील माहिती मुख्याध्यापकांच्या हाताशी असणे अत्यंत आवश्यक आहे.


१. विद्यार्थी हजेरी पत्रक (सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेने हजेरी पत्रकाचे दोन प्रतीत झेरोक्स करून ठेवावे)


२. इयत्तानिहाय पट (मुले मुली)


३. शाळा UDISE कोड


४. मुख्याध्यापक पूर्ण नाव व भ्रमणध्वनी


५. कार्यरत शिक्षक यादी व भ्रमणध्वनी


६.शाळा माध्यम:सेमी इंग्रजी असल्यास इयत्ता व तुकडी संख्या :


७.शाळा व्यवस्थापन प्रकार


८.ग्रामीण/शहरी

Friday 2 July 2021

विद्यार्थी प्रमोशन 2021-22

🌸💐🌺🏵🏵🌺💐🌸 संचमान्यता आता विद्यार्थी आधार नोंदणी वर होणार आहे 🌸💐🌺

Thursday 1 July 2021

संचमान्यता सन2020- 21

संच मान्यता 2020-21 कार्यरत शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरण्यासाठी स्कूल पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाली आहे. 

➡️ Google Chrome ओपन करा व www.education.maharashtra.gov.in ही वेबसाईट टाकून घ्या. 

➡️ ही माहिती आपण मोबाईलवर भरत असाल तर मोबाइलला प्रथमतः "Desktop Site" करून घ्या. 

➡️ त्यानंतर "शाळा" यावर क्लिक करा. ➡️ त्यानंतर "Sanchya Manyata" यावर क्लिक करा. 

➡️ पुन्हा "Sanchya Manyata" यावर क्लिक करा. 

➡️ यानंतर लॉगिन पेज ओपन होईल शाळेचा यु डायस कोड, पासवर्ड व Captcha टाकून लॉगिन करून घ्या.

 ➡️ लॉगिन झाल्यानंतर संचमान्यतेसंबंधी आपणास सूचना दिसेल ती सूचना वाचून आपण त्यावर "Ok" असे म्हणा. 

➡️ यानंतर "Working Post" या मेनूमध्ये "Add Working Teaching Staff" या ऑप्शन वरती क्लिक करून "Medium" निवडून घ्या व योग्य अनुदान प्रकारानुसार 1 Octomber 2020 रोजी कार्यरत शिक्षक संवर्गातील पदांची माहिती नोंद करून "Update" व "Finalize" करून घ्या.

 ➡️ यानंतर "Working Post" या मेनूमध्ये "Add Working Non-Teaching Staff" या ऑप्शन वरती क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार 1 Octomber 2020 रोजी कार्यरत शिक्षकेतर संवर्गातील पदांची माहिती नोंद करून "Update" व "Finalize" करून घ्या.

 ➡️ "खात्रीसाठी "Progress Bar" चेक करून घ्या.

Wednesday 30 June 2021

शालार्थ pay slip काढणे

🌸💐🌺🏵🏵🌺💐🌸 🟣 *प्रत्येक महिन्यांची Salary Slip आता ऑनलाईन पाहता येणार* 🟣 आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता. यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा *शालार्थ ID.*(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID) यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा 1) https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp या वेबसाईटला जा. 2) लॉग इन पेजवर जाऊन Username म्हणून तुमचा *शालार्थ ID* टाका. तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे. 3) लॉग इन केल्यानंतर Old password ifms123 हा टाका. New password बनवा (त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा). तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा. 4) लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner जाऊन Pay slip निवडा. 5) 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip निवडा डाउनलोड करा व Print करा. 🌸💐🌺

Friday 16 August 2019

Whatsapp Posts

🌸💐🌺🏵🏵🌺💐🌸  शाळा सिद्धी सन2020 21 भरणेे चालुु झालेे आहेे व udise plus भरणे सुद्धा सन2020- 21 साठी चालू झाले आहे🏵🌸💐🌺

Thursday 15 August 2019

महत्वाची माहिती

🌸💐🌺🏵🏵🌺💐🌸 अल्पसंख्यांक विद्यार्थी फ्रेश / रिनिव्हल फार्म भरने चालु झाले आहे.पात्र विद्यार्थी यादी पाहण्यासाठी रिपोर्ट मध्ये जाऊन सन 2020-21 वर्ष निवडून यादी मिळविता येते. त्यानंतर पात्र विद्यार्थी यांचे फार्म रिनिव्हल मध्ये व अपात्र विद्यार्थी,पहिलीचे विद्यार्थी फ्रेश मध्ये भरावीत.🌸💐🌺🏵🌸💐🌺

Friday 10 August 2018

जंत नाशक मोहीम 2018

💊 *राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम* 💊


*दि.10/08/2018* रोजी शाळा व अंगणवाडयामध्ये मुलांना (वय वर्ष १ ते १८) जंतनाशक गोळी खाऊ घालण्याची मोहिम राबवायची आहे.


🔹जंताचा बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम

🔺रक्तक्षय (अनिमिया )

🔺पोटदुखी,उलट्या, अतिसार, मळमळणे

🔺भूक मंदावणे

🔺कुपोषण

🔺थकवा व अस्वस्थता

🔺शौचाच्या वेळेस रक्त पडणे

🔺आतड्याला सुज येणे.


🔵 जंताचा प्रादुर्भाव थोपविण्याचे मार्ग

🔺जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे

🔺भाज्या व फळे खाण्यापुर्वी व्यवस्थित धुणे

🔺स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे.

🔺पायात चपला,बुट घालावेत

🔺नियमित नखे कापावित

🔺शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचाला बसु नये

🔺परिसर स्वच्छ ठेवावा.


🔵जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे

🔺रक्तक्षय (अनिमिया)कमी होतो

🔺बालक क्रियाशिल होते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

🔺शारिरीक व बौध्दिक वाढ सुधारते

🔺आरोग्य चांगले राहते.


🔹 *जंतनाशक गोळी- एल्बेंडेझाॅल ४०० मि.ग्रॅम* 


🔺वय १ ते २ वर्ष अर्धीगोळी (२०० मि ग्रॅम)क्रश करून पाण्यात विरघळून

🔺वय २ ते 3 वर्ष एक गोळी (४०० मि ग्रॅम) क्रश करून पाण्यात विरघळून 

वय:- 3 ते19 वर्ष एक गोळी(400मि ग्रॅम)  चघळून खाऊ घालणे. 


🔵प्रत्येक शाळा,अंगणवाडीत *दि 10/08/2018* रोजी जंतनाशक गोळी मुलांना प्रत्यक्ष समोर उभे करुन खाऊ घालण्याची मोहिम हाती घ्यावयाची आहे.


शाळाबाहय मुले मुली यांना अंगणवाडी केंद्रात गोळया देणार आहेत.


🔹गोळी खाऊ घालण्यापुर्वी घ्यावयाची काळजी

🔺आहार खाऊ घातल्यानंतर गोळी खाऊ घालणे.रिकाम्या पोटी गोळी खाऊ घालू नये.

🔺प्रत्येक शाळेत एक आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहे.

🔺आजारी बालकांना गोळी देऊ नये.ते बालक ठिक झाल्यानंतर किंवा वंचित लाभार्थी यांना *मॉप अप राऊंड दिन* दि 16-08-2018 गोळी देणे.

🔺गोळी दिल्यानंतर २ तास मुलांना शाळा, अंगणवाडीत थांबवून ठेवावे.

🔺गोळी खाल्यानंतर काही दुष्परिणाम दिसल्यास क्षार संजिवनी पाजणे.त्वरीत वैदयकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधणे. 

🔺ज्यामुलांच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त आहे त्यामुलांना गोळी खाल्या नंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तेंव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही...

Friday 20 April 2018

SDMIS बाबत करावयाची कार्यवाही




*_SDMIS(समग्र शिक्षा अभियान)_*


➡ केंद्र प्रमुख यांच्या लॉगिन वर काम करावयाचे आहे.


➡ लॉगिन करून student tab वर क्लीक करणे.


➡ क्लिक केल्या नंतर *4 नंबर टॅब*(bulk download/update data excel) वर क्लीक करणे.


➡ पुढे दिसणाऱ्या  pick line वर yes/no  बटन आहे.

फाईल download करण्यासाठी  no म्हणणे.


➡ *समोर एक टॅब ओपन झालेली असेल त्यात school name वर क्लिक करून शाळा निवडणे नंतर class (जो हवा असेल तो class निवडणे) नंतर section क्लीक करून आपली  तुकडी निवडणे (A,B,C इत्यादी) त्या1 नंतर get excel template* वर क्लिक करून फाईल *download* करणे.


➡ *Download* झालेल्या फाईल मध्ये  कसलाही बदल न करता त्यात येणाऱ्या कोऱ्या कॉलंम मध्ये माहिती भरावयाची आहे.


➡ माहिती भरून झाल्यानंतर परत *student* टॅब वर क्लिक करून

 *bulk download/update data excel* वर क्लिक करणे.


➡ त्या नंतर फाईल *upload* करण्यासाठी  *yes* म्हणणे व फाईल ज्या ठिकाणी *save* असेल त्या ठिकाणावरून upload करावी.



🔵 *समग्र मध्ये माहिती भरताना घ्यावयाची काळजी*⤵


🔅 प्रत्येक वर्गाची वेगळी फाईल download करावी लागेल.


🔅फाईल csv मध्ये convert करू नये.


🔅फाईलचे नाव बदलू नये.


🔅(* स्टार) *केलेली कॉलम भरणे बांधणकारक आहे.*


🔅आधार कार्ड नंबर नसेल तरी माहिती भरायची आहे.






Tuesday 6 March 2018

महत्वाची सूचना

-: *Notice*:-


*सर्वांना सूचित करण्यात येते की,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व प्राथमिक शाळांची संच मान्यता पूर्ण करण्यात आलेली असून संच मान्यताची Finalize असलेली प्रिंट केंद्रप्रमुख व शिक्षणाधिकारी लॉगीन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे*


*तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळेतील एका अनुदान प्रकारातील एका माध्यमाच्या (Single Aid-Single Medium) व बहु अनुदान प्रकारातील एका माध्यमाच्या (Multi-Aid Single Medium) सर्व शाळांची संच मान्यता Draft Mode स्वरूपात शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तरी आपल्या स्तरावरून सदर संच मान्यता तपासून घ्याव्यात व काही बदल अथवा दुरुस्ती असल्यास तसे तात्काळ कळवावे*

Sunday 4 March 2018

अपघात विमा योजना

*आतिमहत्वाचे* 

 *सर्व मुख्याध्यापक* 

  *महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दि 11/8/2017 च्या शासन निर्णयाने कर्मचाऱ्यांना अपघाती मृत्युसाठी 10,00,000 रुपयांचा विमा दिला आहे...अपघाती विकलांगता आल्यास काही अटींंच्या अधिन राहुन अंशत: संरक्षण दिले आहे... शिक्षक व शालेय कर्मचाऱ्यांचाही यामधे समावेश केला आहे..300+54( GST18%) असे केवळ 354 रु भरुन एक वर्षाची रिस्क कव्हर होणार आहे..*


 राज्य शासकीय / निमशासकीय कर्मचारी समुह अपघात  विमायोजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी आपापल्या    फेब्रुवारी  2018 या चालू महिन्यात जोडपत्र 4 व 6 भरून द्या.

*राज्य शासकीय कर्मचारी समूह अपघात विमायोजना*..

(शासननिर्णय,वित्त विभाग/4 फेब्रुवारी 2017)

ही योजना अगोदर फक्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू झाली....


त्यानंतर...


*दि.11 August 2017*

 *शासननिर्णय(वित्त विभाग) नुसार ही योजना महाराष्ट्रातील सर्व शासकीय/अनुदानित/स्थानिक स्वराज्य संस्था,महामंडळे कर्मचारी/अधिकारी यांना लागू झाली आहे*....


ही योजना ऐच्छिक आहे.


*ह्या योजनेत समाविष्ट होण्यासाठी "फेब्रुवारी" 2018 च्या वेतनातून" 354/-₹(तिनशे चोपन्न ₹) कपात करून देणे आवश्यक आहे*.

Sunday 22 October 2017

शाळा सिद्धी


*नमस्कार* 🙏
✨ *शाळा सिद्धी आॅनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया* ✨

🔵 इंटरनेट सुरु करा.
🔵 Google Chrome ओपन करा.
🔵 Address बार मध्ये *"14.139.60.151/sse/login.php"* टाईप करुन Enter  दाबा.
🔵 NPSSE ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये Login च्या box मध्ये *"Create New Account"* या पर्यायावर क्लिक करा.
🔵 Add User ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये *"User Name / UDISE"* च्या पुढे आपल्या शाळेचा UDISE कोड टाईप करा.
🔵 त्याखाली असलेल्या *"Password"* च्या समोर आपल्या आठवणीत राहील असा पासवर्ड टाईप करा. *लक्षात ठेवा : प्रत्येक लॉगीनच्या वेळी हा पासवर्ड आपल्याला टाकावा लागणार असल्यामुळे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे.*
🔵 त्याखाली *"E-mail"* च्या समोर आपल्या शाळेचा ई-मेल आय डी टाईप करा. शाळेचा ई-मेल आय डी तयार नसेल तर तो Gmail. Com वर जाऊन तयार करुन घ्या. किंवा आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
🔵 त्याखाली *"Role Type"* या पर्यायासमोर *"School User"* हा पर्याय निवडा.
🔵 वरिल सर्व बाबी बरोबर नमुद केल्याची खात्री झाल्यावर सर्वात खाली असलेल्या *"Submit"* या पर्यायावर क्लिक करा.

✨ *आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी झालेली आहे.* ✨

🔷 आता आपल्या शाळेचा *"DASHBOARD"* बघूया.
🔹डेस्कटॉपवर वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या *"LOGIN"* या पर्यायावर क्लिक करा.
🔹LOGIN विंडो दिसेल. त्यामध्ये *"USER TYPE"* च्या समोर *"School User"* हा पर्याय निवडा.
🔹त्याखाली आपल्या शाळेचा *"UDISE Code"* टाईप करा.
🔹पासवर्ड टाकून *"Submit"* या पर्यायावर क्लिक करा.
*आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसू लागेल.*

✨ *शाळेची Basic Information भरणे.* ✨

🔵 आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसल्यावर त्याच्या डाव्या बाजूला *"Basic information"* दिसते. त्यामध्ये *Learner's* या पर्यायाखाली :
1) Demographic Profile
2) Attendance Rate
3) Performance in key subjects
4) Learning Outcomes
*Teachers* या पर्यायाखाली
1) Numbers of Teachers
2) Teacher's Attendance

*वरील प्रत्येक पर्यायासमोर क्लिक केल्यावर त्यामध्ये भरावयाच्या माहीतीची विंडो ओपन होते. ती सर्व माहिती भरुन झाल्यावर खात्री करुन Submit पर्यायावर क्लिक करायला विसरु नका.*

✨ *7 क्षेत्र व 45 मानकांची माहीती भरुन स्वमूल्यमापन अहवाल भरणे.* ✨
 बंधू भगिनींनो!  Learners व Teachers ची माहीती भरल्यावर त्याच विंडोमध्ये आपल्याला *"7 KEY DOMAINS AS CRITICAL PERFORMANCE AREAS OF SCHOOL* च्या खाली सर्व 7 क्षेत्र दिसतील.
*शाळा सिद्धी मध्ये आपण चर्चा करीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील मानकांची चांगल्या पद्धतीने उपलब्धता वाटल्यास तशी नोंद स्वयं - मूल्यमापन अहवालात करावी. उगाच खोट्या नोंदी करु नये.*
स्वयं मूल्यमापन करतांना प्रत्येक क्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे. ते कसे करावे या साठी आपण प्रत्यक्ष चर्चेत भाग घेणे आवश्यक आहे.

*बंधू भगिनींनो! आजच आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी करून आपल्या परिसरातील शाळांसाठी आपली शाळा आदर्श बनवूया.* सर्वांना उज्ज्वल भविष्याच्या हार्दीक शुभेच्छा! 🙏💐

: *अतिशय महत्त्वाचे : Learners आणि Teachers याची माहिती भरतांना ती 2015-16 व 2016-17 या दोन्ही सत्रांची भरावी.*